
जनता विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पिंपळगाव सराई (ता . जि. बुलढाणा) – येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, चिखलीचे संचालक सहदेवराव सुरडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाड तालुका संघचालक सुभाषजी बारस्कर, स्थानिक सत्लागार समिती सदस्य सदाशिव शिंदे, रमेश देशमाने, संजय जोशी आणि भावसिंग सोळंकी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. अध्यक्ष सहदेवराव सुरडकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. विद्यालयाच्या गीत मंच चमूने देशभक्तीपर समूहगीत सादर करून वातावरण देशप्रेमाने भारून टाकले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर ‘ कवायतीचे प्रात्यक्षिक केले, जे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
यानंतर इको क्लब व तरुण भारत या नियतकालिकाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तुळशी रोपणाचा उपक्रम अध्यक्ष सहदेवराव सुरडकर, सदाशिव शिंदे व गावातील मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
जनता प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभही याच वेळी पार पडला. प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या भाषणात म्हटले, "स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी. त्यांचे शौर्य आणि त्याग हे आपल्याला नेहमीच योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहील."
कार्यक्रमाला प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे, भूतपूर्व शिक्षिका रंजना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मांजाटे यांनी केले, आज्ञा संचालन सुदाम चंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय पिवटे यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.