logo

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली (मैना) येथे 79 वा 'स्वातंत्र्य दिन ' उत्साहात साजरा...!

काटोल प्रतिनिधी - देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली (मैना ) येथे गावातील नागरिकांत व विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती जागरूकता व राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण व्हावा, याकरता चिखली (मैना ) गावात प्रभात फेरी ( रॅली ) काढण्यात आली. त्यानंतर झेंडावंदन ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्या -सौ. कुमुद जी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष - दिनेश जी दुपारे, ग्रामपंचायत सदस्य सतीश जी काळे, पोलीस पाटील भुजंगजी गोंडाणे, ग्रा. सदस्या- अंजली दुपारे, बचत गट सीआरपी - शीलाबाई शेंडे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवा मंडळी ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन - मुख्याध्यापिका सौ.वनिता ढोक मॅडम यांनी केले. मा. सतीश जी काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पोलीस पाटील भुजंग जी गोंडाणे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वतंत्र दिनानिमित्त A. V. फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्किट व खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे आभार नवीन सहाय्यक शिक्षक त्यांनी केले. व कार्यक्रम उत्साह साजरा झाला.

150
4440 views