logo

आ. श्वेता महाले यांना "महाराष्ट्र रत्न'

एका विकासाभिमुख संवेदनशील नेतृत्वाचा योग्य सन्मान...

चिखली/सत्य कुटे :
भारत विकासाच्या मार्गावर वेगाने धावत आहे आणि विश्वातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे भारताच्या या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा वैश्विक स्तरावर सन्मान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्र समूह लोकमत द्वारे भव्य लोकमत ग्लोबल कन्वेंशन समिट अँड अवॉर्ड्स 2025 च्या द्वितीय आवृत्तीचे आयोजन लंडन येथे करण्यात आलेले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेता महाले पाटील यांना महिला नेतृत्वाची नवीन परिभाषा प्रदान करणाऱ्या कर्मठ पारदर्शक आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून लोकमत परिवाराच्या वतीने "लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार" दिला जात आहे.

जेव्हा एक सामान्य महिला समाजाचा आवाज बनते, लोकप्रतिनिधी म्हणून पुरुषसत्ताक समाजाला विकासाच्या एका पर्वाकडे आगेकूच करण्यासाठी प्रोत्साहित करते. त्यावेळेस राजनीति ही फक्त एक व्यवस्था नव्हे तर आशेची एक मशाल बनते, जी सबंध समाजाला प्रकाशमान करण्यासाठी कारणीभूत ठरते.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि संघर्षातून नेतृत्वापर्यंतचा प्रवास करणाऱ्या श्वेता ताई यांनी चिखली मतदारसंघातून दोन वेळेस विजय प्राप्त केला असून चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हृदयामध्ये त्यांनी विश्वासाची व हक्काची एक प्रबळ जागा बनवलेली आहे. ग्रामीण विकास, महिला सशक्तिकरण, शिक्षन, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य उत्कृष्ट नारी शक्तीचे एक सशक्त उदाहरण आहे. त्यांनी केवळ शासनाच्या योजना गावागावापर्यंत पोहोचवल्या नाही तर हजारो महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक स्वयंप्रकाशित रस्ता दाखविला.

गावागावांमध्ये रोजगार, मुलींचे शिक्षण, महिलांसाठी सर्वाइकल कॅन्सरच्या लसीचे मोफत वाटप, शेतकऱ्यांसाठी अनेक गावांमध्ये सोलर पार्क,शेतांना गावाशी जोडणारे आणि गावांना शहराशी जोडणारे अनेक रस्ते तयार करणे, पाण्यासाठी ठिकठिकाणी विविध योजनांची अंमलबजावणी विद्युत विभागाच्या नवीन डिव्हिजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यवर्धन आणि प्रत्येक नागरिकाला संवाद व समर्पण या गोष्टी आपल्या कृतीतून शिकवणाऱ्या जनप्रतिनिधी आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्ता सुद्धा आहेत.

त्यांच्या या सर्वांगीण कामाचा इतर लोकप्रतिनिधी समोर एक चांगला आदर्श निर्माण झाला असून त्यातून समाजाची नैतिक मूल्यावर अधिष्ठातीत विकासाभिमुख रचना तयार होण्यास मदत मिळेल असा संदेश या पुरस्कार सोहळ्यातून जगभर जाईल असे पुरस्कार प्रदान करणाऱ्या समितीने म्हटले आहे.

12
457 views