logo

बाबंरूड़ (राणिचे) येथे श्री क्षेत्र विध्यवासिनी मंदिर संस्थानतर्फे श्रावण महीन निमित्त सालाबार प्रमाने भंडाराचे आयोजन.....!

बाबंरूड़ (राणिचे) येथे श्री क्षेत्र विध्यवासिनी मंदिर संस्थानतर्फे श्रावण महीन निमित्त सालाबार प्रमाने भंडाराचे आयोजन करण्यात आले.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
पाचोरा तालुक्यातील बबाबंरूड़ (राणिचे) येथे श्री क्षेत्र विध्यवासिनी मंदिर संस्थानतर्फे श्रावण महीन निमित्त सालाबार प्रमाने भंडारादरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण सोमवारी भक्तीमय वातावरणात दुर्गा मातेच्या मंदीराजवळ मोर्या उत्सवाचा भंडारा संपन्न झाला. पहाटेपासूनच गावात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. उत्सवाची सुरुवात मंगल स्नान, पूजा-अर्चा आणि मंत्रोच्चारांनी करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण धुमधुमून गेले.

श्री क्षेत्र विध्यवासिनी मंदिराच्या भंडारा चे आवचित साधुन पाचोरा पोलीस स्टेशनचे पी.आय राहुल कुमार साहेब यांनी भेट देऊन महाराष्ट्र शासनाच्या "झाडे लावा झाडे जगवा"या योजने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण केले.

यावेळी पाचोरा पोलिस स्टेशन चे पी.आय श्री राहुल कुमार साहेब यांच्या शाल श्रीफल देऊन मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी सत्कार केला.

यावेळी संजय नाना वाघ, अध्यक्ष - गंगाराम देवरे, उपाध्यक्ष - राजेंद्र पाटील, सचिव- राजेंद्र वनाजी सोनार, पंचायत समिति सदस्य ललित वाघ , पोलीस पाटील भूषण पाटील, ग्रामपंचायत सदस्य,मनोज वाघ स्वयपाकी- नाना देवरे, बापू देवरे,कैलास सोनी,छोटु नगरदेवळा व भंडारा उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत दुर्गा मातेची आरती सादर केली. दर्शनानंतर सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता आला.

स्थानिक ग्रामस्थ, तरुण मंडळे आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा भव्य सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित भक्तांनी यंदाचा उत्सव अधिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा झाल्याचे सांगितले.

27
81 views