logo

प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ बंद करा - गणेश अण्णा तादलापूरकर


नांदेड : सध्या महाराष्ट्रामध्ये जुने मीटर बदलून प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची जी मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे. ती मोहीम योग्य नाही. हि प्रक्रिया तात्काळ थांबवा अशी मागणी आज निवेदणाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, मा.महामाहीम राज्यपाल व राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याकडे नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर यांनी केली आहे. राज्यात या पूर्वी अगोदर वीज नंतर विज बिल ही संकल्पना लोकांच्या अंगवळणी पडलेली आहे. त्यामुळे हे गरीब आणि सामान्य लोकांना प्रीपेड स्मार्ट मीटर परवडणारे नाही. ते लोक उशिराने का होईना विज बिल भरणा करतात, परंतु त्यांच्याकडे प्रीपेड विज बिल भरण्यासाठी पैसा उपलब्ध असेलच असे नाही. त्या कारणाने ते सामान्य जनतेची हेळसांड हे सरकार करीत आहे.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री घोषणा करतात कि दर महिन्याला 300 युनिट पर्यंत वीज बील माफ करण्यात येणार आणि दुसरीकडे राज्यात प्रिपेड मिटर बसविण्याची मोहीम जबरदस्तीने आणि जोरात सुरु आहे. जनतेचा या प्रिपेड स्मार्ट मिटर बसविण्याला विरोध असताना खाजगी कंपनी ठेकेदारकडून ही मोहीम राबवित आहेत. हे चुकीचे धोरण सरकार राबवित आहे. हे थांबविले पाहिजे. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवणे योग्य नाही.हा सामान्य जनतेवर चा अन्याय आहे.त्याकरिता त्वरित तो निर्णय मागे घ्यावा. अन्यथा या संदर्भाने सरकारच्या विरोधात जनतेला कठोर पावले उचलावे लागणार. व रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद सरकारने घ्यावी असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला .
निवेदनावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर,राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.देविदास इंगळे, कॉ.दिगंबर घायाळे, निवृत्ती गायकवाड, माणिका बोडके, एन एम वाघमारे, नागोराव आंबटवार, के डी वाघमारे, कॉ. दिलीप कंधारे, संजय कंधारे, भागवत कंधारे यांच्या स्वाक्षरी आहेत.

0
606 views