logo

विरोधी पक्षनेता खा. राहूल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे निषेध आंदोलन

विरोधी पक्षनेता खा. राहूल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे निषेध आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी) - निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. दरम्यान या निषेधार्थ खा. रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार व उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील आयटीआय चौक येथे सोमवार (ता.११) रोजी निषेध आंदोलन करण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या मार्फत निवडणूकी दरम्यान झालेल्या मतचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू असताना विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आदीसह इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ खा. रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार व उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शहरातील आयटीआय चौक येथे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार (ता. ११) निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरेशदादा गायकवाड, मसुद खान, जयश्री पावडे, आनंद चव्हाण, अब्दुल गफार, प्रफुल्ल सावंत, सुरेश हाटकर, गंगाधर सोनकांबळे, अजिज कुरेशी, बालाजी चव्हाण, सत्यपाल सावंत, मुन्तजीब, महेश मगर, बापूसाहेब पाटील, निरंजन पावडे, विलास पावडे, अतूल पेदेवाड, अंबादास रातोळे, अभिलाष पावडे, दिपकसिंग हुजुरिया, माधवराव पवळे, विक्की राउतखेडकर, अझर शेख, अरिफ खान, इंजि. नसिम पठाण, हंसराज काटकंळबे, लतिफ पठाण, प्रसेनजित वाघमारे, मिर्जा युसूफ बेग, नागराज सुलगेकर, तुषार पोहरे, गौतम सिरसाट, अनिल चिमेगावकर, फिरोज भाई, डॉ. बारी, नईम शेख, रिजवान पटेल, संजय शर्मा, अभिमान सावंत आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
0 views