logo

रक्षाबंधन निमित्त सौ. सोनिया गोरे यांचे इंजि. सुनील पोरे यांना औक्षण

महाराष्ट्र
सातारा (म्हसवड – प्रतिनिधी )
रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्त राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनिया गोरे यांनी म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांचे बोराटवाडी येथील निवासस्थानी जाऊन राखी बांधून औक्षण केले.

या प्रसंगी सौ. सोनिया गोरे म्हणाल्या, “इंजि. सुनील पोरे यांच्याशी आमचे कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध असून ते ना. जयकुमार गोरे यांचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी आहेत. म्हसवड शहर व परिसरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लक्षणीय योगदान दिले आहे. पाणी व रस्त्यांसाठी उपोषण, कोरोना काळात अन्नदान, अँब्युलन्स सेवा, औषध वितरण अशा अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, आगामी काळात इंजि. पोरे यांच्या हातून आणखी मोठी व लोकहिताची कामे घडावीत, या शुभेच्छांसह आजच्या पवित्र सणानिमित्त त्यांना राखी बांधण्यात आली.

या वेळी बाळासाहेब पिसे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

18
1713 views