कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन रक्षाबंधन या उपक्रमातून स्वसंरक्षणाचा संदेश*
*रक्षाबंधन या उपक्रमातून स्वसंरक्षणाचा संदेश*
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन तर्फे दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी, स्वामीनारायण पोलीस चौकी , संभाजीनगर नाका येथे ट्राफिक पोलीस हवालदार, कीर्ती गोसावी, गोरखनाथ रेहरे, निलेश पवार, दशरथ पागी आणि कॉन्स्टेबल सोमनाथ ढिकले यांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
तसेच हेल्मेट जनजागृती अभियान अंतर्गत हेल्मेट न वापरणारी व्यक्ती ला राखी बांधून अपघात मुक्त शहर करण्याचा मानस राखी विथ खाकी उपक्रम बागलाण तालुका महिला अध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला, त्यांना स्वसंरक्षणासाठी हेल्मेट घालने किती गरजेचे आहे हे समजून सांगण्यात आले.
त्याप्रसंगी, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे पदाधिकारी मनोरामा पाटील, ॲड सौ कामिनी भानुवंशे,मंजुषा जाखडी, श्री प्रकाश अब्बड, सुनीता धनतोले,ज्योती जोशी, सविता कुलकर्णी, प्रमिला कुंभार ,भावना जोशी, वर्षा राजपूत कु नेत्रा भानुवंशे, आदित्य जोशी, शिवा जोशी,रेखा पाटील, काजल देवरे आदी उपस्थित होते.