logo

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीमच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे

*कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीमच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे*

दिनांक ९/८/२०२५ वार शनिवार रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधून कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीमच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. सर्वप्रथम सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मा. योगेश पाटील व सर्व उपस्थित पोलीस बांधवांना राख्या बांधून सन्मानपत्र देऊन त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्यात आला, त्यानंतर ताहाराबाद नाका ते जिजामाता गार्डन पर्यंत जाऊन विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या बांधवांना *एक राखी बहिणीच्या मायेची सुरक्षा बंधू च्या कुटुंबाची* म्हणून राखी बांधून भावांना सुरक्षिततेची जाणीव करून दिली, तसेच *हेल्मेट वापरा बंधूराया जीवन सुरक्षित कराया* हे घोषवाक्य देऊन सर्वांचे या उपक्रमाकडे लक्ष वेधून घेतले, संपूर्ण बागलाण तालुक्यातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे तसेच अनेक बांधवांनी समाधान व्यक्त केले व हेल्मेट वापरूनच वाहन चालवू असे आश्वासन दिले, जे बांधव हेल्मेट परिधान करून वाहन चालवत होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.यावेळी जांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला त्या कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाऊंडेशनच्या बागलाण तालुका अध्यक्ष वैशालीताई सोनवणे, ज्योतीताई ठाकरे, पूजा दंडगव्हाळ, राजश्री पंडित, सौ मनीषा ताई पांडे, सोनाली ठाकरे, नूतन गंगेले, शारदा जाधव, पुष्पा जाधव, पोर्णिमा शिवदे शिक्षक आघाडी मधून सचिन अहिरे व नयना गोसावी हे उपस्थित होते. अतिशय अनोखा असा हा उपक्रम होता. अनेक बांधवांनी या उपक्रमाबाबत आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मा.योगेश पाटील सर्व पोलीस बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक केले, या उपक्रमामुळे अनेक अपघातांना आळा बसेल व अनेक कुटुंब सुरक्षित होतील असे मत व्यक्त केले, जवळजवळ दोन ते अडीच तास या उपक्रमाच्या माध्यमातून 200 च्या वर बांधवांना राख्या बांधून सुरक्षिततेचे जाणीव करून दिली सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल बागलाण तालुका अध्यक्ष वैशाली सोनवणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

55
1922 views