गोंदियातील ८ दिव्यांग भगिनींना डॉ. रंजन यांची राखीची अनोखी भेट
गोंदिया – राखी पौर्णिमेच्या शुभ अवसरावर ग्रॅंड मास्टर डॉ. रंजन सिंह यांनी गोंदिया जिल्ह्यातील ८ दिव्यांग भगिनींना हँडिकॅप ट्रायसायकल भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमामागे त्यांच्या 'प्रत्येक व्यक्ती सक्षम व्हावी' या दृढ संकल्पनेचा प्रत्यय आला.मुंबई आणि परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्ततेमुळे डॉ. रंजन सिंह स्वतः कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी Google Meet द्वारे कार्यक्रमास संबोधित केले व सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.आपल्या ऑनलाईन संदेशात डॉ. रंजन म्हणाले, "स्वावलंबन हेच खरे सशक्तीकरणाचे प्रतीक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या भगिनींच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्यासाठी खरी राखीची भेट आहे.”कार्यक्रमादरम्यान अनेक सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि स्थानिक नागरीकांची उपस्थिती होती. डॉ. रंजन यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.