
कराडमध्ये सराईत गुन्हेगाराकडून देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
सातारा (कराड ) : कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मलकापूर येथे सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार जीवन शांताराम मस्के (वय 30, रा. शुक्रवारपेठ, कराड) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई शुक्रवारी (दि. 8 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी चौक, मलकापूर येथे करण्यात आली. गुन्हेगाराकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, पोलीस नाईक संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, धिरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, मोहसिन मोमीन, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, मुकेश मोरे आणि सोनाली पिसाळ यांचा समावेश होता.
कराड शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा पूर्णत: नायनाट करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.