logo

*तरुणाने इन्स्टाग्राम लाईव्ह करत छातीत खुपसला सुरा; उपचारादरम्यान मृत्यू*

लातूर जिल्ह्यातील निलंगा शहराजवळील अंबुलगा बु. येथील 27 वर्षीय भरत बालाजी सागावे या तरुणाने मानसिक नैराश्यातून इन्स्टाग्राम लाईव्ह करत स्वतःच्या छातीत सुरा खुपसून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या उपचारासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न होणे आणि आई-वडिलांनी आर्थिक मदत नाकारणे यामुळे भरत गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. शनिवारी दुपारी लांबोटकर पेट्रोल पंपाजवळील आंब्याच्या झाडाखाली त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

4
153 views