logo

नाशिकमध्ये रक्षाबंधनासाठी राख्या खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी

प्रतिनिधी ०९ ऑगस्ट (नाशिक) :- नाशिकमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाऊ बहिणीचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे. बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाला दिली जाते. म्हणूनच रक्षाबंधन या सणाला भाऊ आणि बहिणीला विशेष महत्त्व आहे. यासाठीच आपले वडीलधारी मंडळी भावाला बहीण असावी आणि बहिणीला भाऊ असावा असे बोलत असतात.

नाशिक मधील सर्व बाजारपेठा राख्यांनी फुलून निघाल्या होत्या. यामध्ये वेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या. वेगवेगळ्या आकारांमध्ये, कलर मध्ये, डिझाईन मध्ये आकर्षक अशा राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या होत्या. अगदी कमीत कमी किमती पासून ते जास्तीत जास्त किमतीपर्यंत राख्या मिळत होत्या.


राख्या खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. आपल्याला हव्या अशा राख्या बहिणी खरेदी करत होत्या. रक्षाबंधन या सणामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता. महाराष्ट्र राज्य सरकारच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकतेच दीड हजार रुपये जमा झाल्याने रक्षाबंधनाच्या सणाच्या उत्साहात आणखी भर पडली. या रक्षाबंधनाच्या उत्सवामुळे पूर्ण नाशिक मधील वातावरण आनंदी झाले होते.

28
2833 views