
' ग्राहकांची बनावट सही करून बँक व्यवस्थापक करतात गैरव्यवहार...!
काटोल प्रतिनिधी - स्टेट बँकेच्या लोहारीसावंगा शाखेतील शाखेत अजब प्रकार...! सध्या कर्जमाफीसाठी विविध संघटना तर्फे सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक आपल्या मनमर्जीने कर्जदार शेतकऱ्याचे खाते परस्पर रिन्यूअल करत आहे. शेतकऱ्याची परवानगी न घेता खाते रिन्यू करणे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार चुकीचे आहे परंतु प्रथम थडीपवनी येथील शाखेत गैरप्रकार करून 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे रिन्यूअल केले गेले. सदर भ्रष्टाचार लक्षात आल्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष सागर दुधाने यांनी नरखेड तालुक्यातील सर्व बँकांच्या शाखा मध्ये दोन दिवस भेटीचा कार्यक्रम राबवला. सदर भेटीच्या कार्यक्रमात माहिती घेतली असता लोहारी सांवगा शाखेत व्यवस्थापकाने खातेदाराची खोटी सही करून कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात व्यवहार केल्याचे उघडीस आले. सदर चुकी बाबत व्यवस्थापकांना विचारपूस केली असता त्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारण्याचा प्रयत्न केला.येत्या ७ दिवसात कर्ज भरून प्रकरण निकाली काढतो असे सांगितले. अशा प्रकारचे प्रत्येक बँकेच्या शाखेत भष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची चौकशी करावी. अशी मागणी तालुका अध्यक्ष योगेश भादे, प्रमोद पंचभाई, युवा तालुका अध्यक्ष नकुल लोहे, युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौधरी, हरीश हजारे,सागर बर्डे, जयंत चापले, संजय ठाकरे,प्रतीक ठाकरे, शुभम चौधरी, आशु पोतदार, रोशन काळे यांनी केली आहे.