
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. मयंक माधव साहेब (IPS)यांची भेट घेऊन त्यांना नव्या शहराच्या जबाबदारी बद्दल शुभेच्छा
दिल्या..
दिनांक ०९-०८-२०२५
तुमसर शहरात मागील दोन महिन्यांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते आहे.
विशेषत बंद घरांना लक्ष करून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे
शहरातील विविध भागातील चोरट्यांनी हैदोस घातला असून घरफोडी मोबाईल चोरी दुचाकी चोरीच्या व शेतातील शेत पंप व मोटारी चोरी व २ ऑगस्टला शनिवारला एकाचदिवशी नवीन बसस्थानका जवळ मोबाईल शॉपी येथे चोरी आणि सिहोरा येथील ज्वेलरी दुकानात चोरी झाली.
व हल्ली तुमसर रोड येथे ६ ॲागष्टच्या पहाटे चार वाजे दरम्यान रेल्वे कर्मचारी महेंद्र नागपुरे यांच्या घरी चोरीची घटना घडली तर शारदा टेडर्स मधील कॅमेरे दगडाने फोडले व चोरून नेले.
चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे दररोज कुठे ना कुठे चोरटे घटना करतातच.
साखळी पुन्हा पुन्हा वाढतच चालली आहे.या घटनेला लवकरात लवकर आळा घालायला/बसायला हवा.
याकरिता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. मयंक माधव साहेब (IPS)यांची भेट घेऊन त्यांना नव्या शहराच्या जबाबदारी बद्दल शुभेच्छा दिल्या व शहरात सातत्याने सुरू असलेली घडामोडी समजून सांगितले व निवेदन दिले की शहरात परप्रांतीय/ किव्हा बाहेर जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात आहेत या विषयावर त्यांची चौकशी झाल्या पाहिजे व पोलीस विभागामार्फत शहरांमध्ये घोषणा करावे की परप्रांतीयांची पूर्ण पोलीस पडताळणी करूनच त्यांना आपला घर भाड्याने द्यावे अन्यथा घर मालकावरच कारवाई होईल
व शहरात रात्रीला पोलीस गस्त लावावे.
आणि आपले पूर्ण प्रयत्न करून लवकरात लवकर त्या चोरांना पकडून कडक शिक्षा द्यावी.
उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केले की आपल्या आजूबाजूच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले.
निवेदन देताना यावेळी मनसे शहर अध्यक्ष निखिल कटारे,उप शहर अध्यक्ष पुष्पक त्रिभुवनकर,शहर संघटक अश्विन देशमुख,तालुका उपाध्यक्ष सप्नील बुराडे,तालुका संघटक रोशन ढोके,तालुका अध्यक्ष ईशान शेंद्रे तालुका सचिव दीपक सराटे,शहर सचिव सागर भुरे,विभाग अध्यक्ष आदित्य गभने व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.