logo

तोमोई इंग्लिश स्कूलचा स्तुत्य उपक्रम

तोमोई इंग्लिश स्कूलचा स्तुत्य उपक्रम
" समर वेकेशन होम वर्क एक्सिबिशन "

बुलढाणा /सत्य कुटे :

शाळेकडून नेहमीच विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जातो व विद्यार्थी तो नेहमीच करतात. शिक्षकांनी तो चेक करून द्यावा यापेक्षा काहीतरी वेगळे करत तोमोई इंग्लिश स्कूल शाळेने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे गृहपाठ प्रदर्शन भरवले.
यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयानुसार दिलेला गृहपाठ विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर हस्ताक्षर व नाविन्यपूर्ण कलेसह सादर केला होता.
विद्यार्थ्यांनी केलेल्या गृहपाठाचे प्रदर्शन भरवल्यामुळे बाल विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साह होता. हे प्रदर्शन सर्व पालकांसाठी खुले करण्यात आले होते. सर्व विद्यार्थी व पालकांनी प्रदर्शनाचा आनंद घेतला.अशा उपक्रमातुन जिज्ञासा वाढते व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.
या प्रदर्शनाचे उदघाटन.डॉ. प्रतिमा व्यवहारे यांनी केले.याप्रसंगी मुख्याध्यापक अजित जवंजाळ, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.

24
1585 views