
चक्क आधार सेतूच गेला चोरीला गेला!
चक्क आधार सेतूच गेला चोरीला गेला!
चिखली तहसील कार्यालयात चाललय तरी काय?
विजयकांत गवईंचा निवेदनाद्वारे आरोप
चिखली (सत्य कुटे.):
चिखली तहसील कार्यालयातील आधार सेतू मागील पाच वर्षापासून चक्क चोरीला गेला असून गायब सेतू नागरिकांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि.6 ऑगस्ट रोजी चिखली तहसीलचे विद्यमान तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे .
चिखली तहसील कार्यालयातील आधार सेतू हा गत पाच वर्षापासून गायब झाला आहे . चिखली तहसील अंतर्गत ग्रामीण भागातून दररोज दैनंदिन शासकीय कामासाठी हजारो वयोवृद्ध नागरिक, शाळाकरी मुले, दिव्यांग व्यक्ती तहसील कार्यालयात दररोज येत असतात. परंतु येथे आधार सेतू दिसत नसल्यामुळे यांचा हिरमोड होतो.
तहसील कार्यालयामध्ये नेमून दिलेले आधार सेतू त्वरित पुर्ववत सुरू करण्यात यावे, जेणेकरून ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होणार नाही . अशी सुज्ञान नागरीक दबक्या आवाजात येथील आधार सेतु चोरीस गेला असल्याची चर्चा करीत आहेत. त्याचीही ओरड थांबेल .
काही आधार सेतू संचालक हे संबंधित सेतू तहसील कार्यालयामध्ये न चालवता इतर ठिकाणी चालवत असल्याचे दिसून आले आहे. तरी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे आधार सेतू संचालक यांना पाठीशी घालत आहे .कोणतीच कारवाई आधार सेतु संचालकावर पाच वर्षात केलेली नाही.
चिखली तहसील कार्यालयातील चोरी गेलेल्या आधार सेतू अधिकारी व कर्मचारी यांच्या संगन मताने इतर ठिकाणी पाच वर्षापासून सुरू आहे वय वृद्ध, श्रावणबाळ, संजय गांधी, शाळकरी मुलं आणि अपंग व्यक्ती आपल्या आधार संबंधित कामे करण्यासाठी तहसीलच्या बाहेर जावा लागत आहे आणि मनमानी पैसे आधार सेंटरला द्यावे लागतात आणि नागरिकांसाठी आधार सेतू हे तात्काळ चिखली तहसील कार्यालयामध्ये सुरू करण्यात यावे पाच वर्षांमध्ये चिखली तहसील कार्यालयामध्ये आधार सेतू चालत नाही पाच वर्षांमध्ये नागरिकांना आधार सेतूचा लाभ न मिळाल्याने संचालकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचे आधार सेतू रद्द करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला. निवेदन देतेवेळी जिल्हा महासचिव सलीम शेख, कामगार जिल्हा अध्यक्ष सुरेश इंगळे, चिखली शहराध्यक्ष सुनील सोळंके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.