
*श्रीकृष्ण नान्हे यांची भारतीय जनता पार्टीच्या देवळी ग्रामीण मंडळाच्या "भटके विमुक्त आघाडी प्रमुख" पदावर नियुक्ती*
देवळी (जि. वर्धा) :
भारतीय जनता पार्टी, देवळी तालुका (देवळी ग्रामीण मंडळ) यांच्या वतीने श्रीकृष्ण नान्हे, बोपापुर (वाणी) यांची देवळी तालुका अध्यक्ष "भटके विमुक्त आघाडी प्रमुख" या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देवळी पुलगाव विधानसभा आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
माजी खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय घाटे, जिल्हा सचिव राहुल चोपडा, देवळी तालुका अध्यक्ष स्वप्नील खडसे, महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली येरावार यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये श्रीकृष्णा नान्हे यांचा पुढील कार्यकाळात मोलाचा सहभाग राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपाच्या विचारधारेनुसार सामाजिक बांधिलकी जपत, संकटसमयी कार्यरत राहून कार्यकर्त्यांनी सेवा द्यावी, यासाठी
आपल्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेचे कार्य सुबुद्ध व कनखर नेतृत्व प्रदान करणारे ठरेल व पक्षाची विजयी पताका गगनात पोहोचेल असा दृढ विश्वास, नेतृत्व करणारे श्रीकृष्णा नान्हे यांची निवड पक्षाच्या कार्यक्षमतेची ओळख दर्शवते.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, स्थानिक पातळीवरून याचे स्वागत करण्यात येत आहे.