logo

पाचोरा रोटरी कडून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

पाचोरा रोटरी कडून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो.त्या अनुषंगाने रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी ग्रामीण रुग्णालय पाचोरा, अंगणवाडी जारगाव या ठिकाणी स्तनदा माता, गर्भनी भगिनी यांचे साठी रोटे डॉ विजय पाटील स्त्रीरोग तज्ज्ञ यांचे स्तनपान व त्याचे फायदे यासोबत डॉ मुकेश तेली बालरोग तज्ज्ञ यांनी लसीकरण आणि त्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले. रोटे डॉ विजय पाटील यांनी बोलताना सांगितले की आईचे दूध हे नव बालकाला एक प्रकारचे अमृत संजीवनी असून त्यामुळे अनेक आजारापासून देखील संरक्षण मिळते. मातेची प्रकृती देखील स्थिरवते. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, सदस्य डॉ पवनसिंग पाटील, चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर, डॉ प्रशांत सांगडे, डॉ सिद्धांत तेली, श्रीमती अरुणा उदावंत, रावसाहेब पाटील यासोबत वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक, डॉ अमित साळुंखे, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्स, माता भगिनी यासोबत अंगणवाडी सेविका हजर होते.

35
1888 views