logo

पंढरपुर ग्रंथालय मार्गदर्शन कार्यशाला संपन्न

शान मान्य सार्वजनिक ग्रंथालय यांचा सर्वांगीण विकास साठी सोलापुर जिला ग्रंथालय कार्यालय व सोलापुर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उपयुक्त माहिती साठे पंढरपुर तालुक्यातील गोपाळ येथेस्वेरी कॉलेज ऑफ गोपाळपूर या ठिकाणी पंढरपूर ,मंगळवेढा ,माळशिरस ,आणि सांगोला या चार तालुक्याची कार्यशाळा संपन्न झाली
या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक कुंडलिक मोरे सर अध्यक्ष विजयकुमार पवार सचिव साहेबराव शिंदे सहसचिव अनसरशेख ज्योतीराम गायकवाड कल्याणराव शिंदे इत्यादी उपस्थित होते
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक संचालक सुनीलजी हुसे यांनी ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची माहिती दिली
जिल्हा ग्रंथाला निरीक्षक सचिन ढेरे यांनी आर आर एल एफ नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची परिपूर्ण माहिती प्रॅक्टिकल सहित सांगितले
तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील यांनी ग्रंथ संजीवनी व एनजीओ दर्पण याबद्दलची माहिती व त्याचे उपयोग याची पूर्ण माहिती दिली
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले स्वेरी कॉलेज ऑफ गोपाळपूरचे डिन करण पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून या पुढील काळामध्ये जिल्ह्याची कार्यशाळा या कॉलेजमध्ये घ्यावी त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे सहमती दर्शवली
या कार्यशाळेचे प्रास्ताविक सहसचिव अन्सार शेख यांनी केले व सूत्रसंचालन रामदास नागटिळक यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील नागणे यांनी केले
प्रमुख मनोगतमध्ये अध्यक्ष विजयकुमार पवार सर व ज्योतीराम गायकवाड यांनी ग्रंथ शाळेस मार्गदर्शन केले
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रशांत जाधव संचालक मच्छिंद्र लेंडवे प्रवीण पाठक मिलिंद उत्पात प्रमोद गायकवाड दिलीप भोसले संजय सरगर माऊली कुलकर्णी पाटील सर मंगळवेढा हनुमंत शिंदे मावली कुलकर्णी इत्यादींनी प्रयत्न केले
या कार्यशाळेसाठी पंढरपूर ,मंगळवेढा ,माळशिरस ,सांगोला या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय कार्यकर्ते उपस्थित होते

58
5689 views