पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला युवासैनिकांनी चपलेने बदडले
गर्व से कहो हम हिंदू है च्या घोषणांनी परिसर दणाणला
यवतमाळ:- काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "भगवा दहशतवाद" या विषयावर केलेल्या विधानामुळे देशाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी "भगवा" ऐवजी "सनातन" किंवा "हिंदुत्ववादी दहशतवाद" असे संबोधावे, असे वक्तव्य करताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज यवतमाळ येथे संताप व्यक्त करीत युवासैनिकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला चपलेने बदडले. याप्रसंगी “गर्व से कहो हम हिंदू है” च्या घोषणा देऊन युवासैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “भगवा हा शिवरायांचा ध्वज आहे, संतांचा, वारकरी पंथाचा रंग आहे. त्यामुळे याला "भगवा" ऐवजी "सनातन" किंवा "हिंदुत्ववादी दहशतवाद" असे संबोधावे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याविरुध्द आज शिवसेना नेते संजयभाऊ राठोड तसेच पश्चिम विदर्भ विभाग समन्वयक पराग पिंगळे यांच्या मार्गदर्शनात तसेच युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या सुचनेनुसार दाते कॉलेज चौकात युवासैनिकांनी आंदोलन केले. संतप्त युवासैनिकांनी पृथ्वीराज चौहाण यांच्या पोस्टरला चपलेने बदडले. यावेळी चौहाण यांच्याविरुध्द प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी हरीहरभाऊ लिंगनवार – संपर्क प्रमुख, यवतमाळ, श्रीधरकाका मोहोड – संपर्क प्रमुख, गजानन डोमाळे जिल्हाप्रमुख यवतमाळ, योगेशजी वर्मा – तालुका प्रमुख, यवतमाळ, निलेशभाऊ बेलोरकर – शहरप्रमुख, यवतमाळ, अॅड. विशाल गणात्रा– लोकसभा अध्यक्ष, युवासेना, महेश पवार – जिल्हाप्रमुख, युवासेना यवतमाळ, प्रद्युम जवळेकर – युवासेना यवतमाळ, विकास कोल्हे – शहरप्रमुख, युवासेना यवतमाळ, सौरभ तिवारी – शहरप्रमुख, युवासेना यवतमाळ, प्रविण ठाकरे – तालुका प्रमुख, युवासेना यवतमाळ, हर्षद वासाड , परीक्षित धुमे, अमोल जोगदंड , मनीष आडे, हर्षद वासाड, प्रज्वल थुल, निनाद सुरुषे, हिमांशू चव्हाण, ऋषभ अस्कर, परीक्षित धुमे, विशाल राठोड, विनीत भेंडे, योगेश राठोड, अभय राठोड , हर्षल राठोड, अभय जाधव, रोशन पवार, अनिल चव्हाण, पवन शेंद्रे, श्रिजीत डफळे, साई मत्तावार, पवन चौधरी, तेजस सातपुते इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
अपमान सहन करणार नाही
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे हिंदू समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आम्ही हिंन्दू समाजाचा अपमान सहन करणार नाही. त्यांनी हिंन्दू समाजाची जाहीर माफी मागावी. कॉंग्रेसचे नेते धर्माच्या आधारावर राजकारण करु नका अशी भाषणे ठोकतात आणि स्वताच हिंदू धर्माविरुध्द बेताल वक्तव्य करतात, ही दुदैव्याची बाब आहे.
विशाल गणात्रा
युवासेना, लोकसभा अध्यक्ष