logo

सोलापूर जिल्ह्यात ग्रंथालय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालय व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एनजीओ दर्पण व आर आर एल एफ नोंदणी व इतर उपयुक्त माहितीसाठी सोलापूर जिल्ह्यात सोलापूर, पंढरपूर, व माढा या ठिकाणी या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते या कार्यशाळेस सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे ,तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळे साठी जिल्हा ग्रंथालय संघाचे आधारस्तंभ कुंडलिक मोरे, अध्यक्ष विजयकुमार पवार ,सचिव साहेबराव शिंदे, संचालक विनोद गायकवाड, संचालक प्रकाश शिंदे ,संचालक जयंत आराध्य,संचालक ज्योतीराम गायकवाड इत्यादी संचालक उपस्थित होते
या कार्यशाळेसाठी हजर असणारे स्वेरी कॉलेज ऑफ गोपाळपूरचे डिन करण पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
या कार्यशाळेच्या प्रस्ताविक ग्रंथालय संघाचे सहसचिव अन्सार शेख यांनी केले .

67
4696 views