logo

देऊळगाव राजा तालुक्यासह जिल्हाभरातील डाकसेवा २ ऑगस्ट रोजी राहणार बंद

देऊळगाव राजा: भारतीय डाक विभाग आजही आपल्या गतिमान आणि तत्पर सेवेसाठी प्रसिद्ध आहे . यापुढे सुलभ अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 'आयटी २.०' या उपक्रमा अंतर्गत आमूलाग्र बदल घडवून आणले जाणार आहे . यामध्ये एटीपी ॲप्लीकेशन ही नवीन डिजीटल प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

जिल्हयातील सर्व शाखा टपाल कार्यालये व सर्व उपडाकघरांमध्ये ही प्रणाली सोमवार, ४ ऑगस्ट पासून अंमलात येणार आहे. याआधी, २ ऑगस्ट रोजी डेटा स्थलांतर प्रक्रिया होणार असून त्या दिवशी सर्व डाक व्यवहार बंद राहणार आहेत. यामुळे नागरीकांनी आपले व्यवहार शक्यतो २ ऑगस्ट पूर्वीच पूर्ण करावे म्हणजे त्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही असे आवाहन देऊळगाव राजा उपडाकघर मास्टर गणेश कात्रे यांनी केले आहे . या अगोदर ठरल्याप्रमाणे ही प्रणाली ५ ऑगस्टला सुरू होणार होती मात्र रक्षाबंधन सारखा महत्वाचा सण लक्षात घेता ती आता ४ ऑगस्टलाच अंमलात येणार असल्याचे डाक विभागाने कळविले आहे. या नवीन प्रणाली मुळे टपाल व्यवहार अचूक , जलद आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.

33
1932 views