logo

विद्यार्थ्यांच्या संरक्षणार्थ पोलीस काका-दीदी उपक्रमाला सुरुवात.

विद्यार्थ्यांच्या संरक्षणार्थ पोलीस काका-दीदी उपक्रमाला सुरुवात

मन्सूर शहा .AIMA.MEDIA. (प्रतिनिधी):--
विद्यार्थ्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासांपासून संरक्षण देणे, त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर ठेवणे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संरक्षाणार्थ अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री निखिल व निर्मळ यांनी 'पोलीस काका पोलीस दीदी' या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षेबाबत
जागरूक केले जात असून, विविध गुन्हेगारी प्रकार, सायबर गुन्हे, सोशल मिडिया वापरातील सावधगिरी, ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आदी बाबत सखोल माहिती दिली जात आहे। या उपक्रमासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात सहा पोलीस निरीक्षक श्री निखिल ब .निर्मळ , पोलीस हेड कॉन्स्टेबल, शिवाजी सुरडकर,, यांचे पोलीस दादा म्हणून नियुक्ती, तर महिला हेड कॉन्स्टेबल,पोलीस, संघमित्रा साळवे जी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना बोर्डे, यांची पोलीस दीदी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून. या
पोलिस कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश आहे. हे अधिकारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. विशेषत शाळेत येणाऱ्या व जात असलेल्या मुलींना कोणी त्रास देत असल्यास, पाठलाग करत असल्यास वा अश्लील भाषा वापरत असल्यास अशा व्यक्तींविरोधात त्वरित पोलिसांच्या मोबाइनवर संपर्क साधल्यास त्वरित कठोर कारवाई केली जाईल, त्याकरिता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल नंबर सुद्धा, मदतीसाठी देण्यात आली आहे.असे अमडापूर पोस्टे ठाणेदार यांनी सांगितले.

0
110 views