logo

शिंदखेडा शहरातील भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी....!

शिंदखेडा. ( सारनाथ बोरसे )30/07/2025
शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे.कॉलनी परिसरात या मोकाट कुत्र्यांची खूप दहशत आहे.मंदिर परिसर, सोसायट्या, शाळा पटांगणे,जुनी पडकी घरे यांचा या कुत्र्यांनी ताबा घेतल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये म्हातारे किव्वा लहान मुले यांच्यावर अश्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शाळकरी मुलांचा हे कुत्रे पाठलाग करतात.त्यामुळे शाळेत किव्वा शिकवणी ला जाण्यास हे मुळे टाळाटाळ करतात. रात्री रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले असून चालतच नव्हे तर दुचाकी वरून जाणाऱ्या नागरिकांचा हे कुत्रे पाठलाग करतात. त्यामुळे या कुत्र्यांचा लवकरच बंदोबस्त शहरातील नगर पंचायत ने करावा ही मागणी कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे.नाहीतर आपल्या शहरातील सुद्धा एखादी मोठी घटना होऊ शकते हे नगर पंचायत शिंदखेडा यांनी लक्ष्यात घ्यावे.


प्रतिनिधी.. सारनाथ बोरसे सर. 8421369491.

50
1957 views