पहिल्याच श्रावण सोमवारी देऊळगाव राजा येथील श्री पंचानन खोरेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी
देऊळगाव राजा वासीयांचे श्रद्धा स्थान असलेले श्री पंचानन खोरेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण महिन्यात आलेल्या पहिल्याच सोमवारी भक्तांची सकाळ पासूनच मोठी गर्दी उसळली होती.
सकाळपासूनच मंदिरामध्ये अनेक प्रकारची सजावट करण्यात आली होती. रांगोळी,आकर्षक फुग्यांची सजावट फुलांचे आणि पानांचे आकर्षक हार ही बनविण्यात आले तसेच भाविक भक्तांकडून फराळाचे वाटप करण्यात आले.
मंदीर व्यवस्थापन समिती कडून येणाऱ्या भक्तांसाठी उत्तम व्यवस्थापन करण्यात आले. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.