लेडी सिंघम नयना पोहेकर यांच्याकडून तीन ठिकाणी गावठी दारूवर छापा
मानोरा : पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत येणाऱ्या मौजे खापरी तसेच दापुरा येथे दि. २६ जुलै रोजी पोलिसांनी तीन ठिकाणी गावठी हात भट्टी दारूवर छापा टाकून १ लक्ष ४७ हजार ५०० रुपयाचा गावठी हात भट्टी दारूसह मुद्देमाल पंचसमक्ष जप्त करुन नाश केला.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी ग्राम खापरी, दापुरा येथे तीन ठिकाणी सडवा मोहमाच ६२५ लिटर किंमत ६७, ५०० रुपये, गावठी हातभट्टी दारू ३०० लिटर किंमत ६०,००० हजार रुपये व इतर साहित्य २०,००० हजार असा एकूण १ लक्ष ४७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल छापा टाकून पोलिसांनी जप्त केला. आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सरोदे, पीएसआय अजमिरे, बारे, महाजन, पोहवा मदन पुणेवार, नेमाने , जयसिंगकार रोहन यांनी केली.