logo

EVM ऍप वर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न !...

विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती , शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम : महेंद्र सूर्यवंशी [ तहसीलदार ]

"लोकशाहीचा महोत्सव " कृतीतून साजरा झाला : अँड. व्ही एस भोलाणे [ पत्रकार ]

धरणगांव - धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२५ EVM ऍप वर उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रस्नेही शिक्षक एस व्ही आढावे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलचे प्रमुख तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, निवडणूक नायब तहसीलदार सी बी देवराज, निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, ऍड.व्ही एस भोलाणे, आबासाहेब राजेंद्र वाघ , महेंद्र पवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली २१ तारखेला अर्ज भरणे, २२ तारखेला माघार, अंतिम उमेदवार यादी जाहीर, उमेदवारांना चिन्ह वाटप, २३ व २४ तारखेला निवडणुकीचा प्रचार व प्रत्यक्ष मतदान २५ जुलै २०२५ रोजी घेण्यात आले. ज्याप्रमाणे लोकसभा, विधानसभेला बुथ असते त्याचप्रमाणे बुथ सजविण्यात आले बाहेर रांगोळी काढण्यात आली. आज प्रवेश केल्यानंतर मतदान केंद्र अधिकारी १- व्ही टी माळी, २ - जी पी महाजन , ३- एच डी माळी बॅलेट देणारे अधिकारी एम के कापडणे यानंतर मतदानाचे दोन बूथ होते एक विद्यार्थी गट व दुसरा सर्वसाधारण गट असे प्रत्येक विद्यार्थ्याला दोन मत देण्याचा अधिकार होता मतदान केंद्राध्यक्ष म्हणून शाळेची ज्येष्ठ शिक्षक एम बी मोरे होते.
मतदान अतिशय सुरळीतपणे पार पडले ९६ % शाळेच्या मुला - मुलींचे मतदान झाले. ओळखपत्र म्हणून शाळेचे ओळखपत्र होते. विद्यार्थी गटात ६ उमेदवार व सर्वसाधारण गटात ८ उमेदवार होते.एकुण १४ होते. या चुरशीच्या लढाईत एकूण ७ उमेदवार विजयी झाले. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते विजय उमेदवारांना पथक पदभार देण्यात आला. शालेय मुख्यमंत्री हेड बॉय म्हणून पुरुषोत्तम पाटील, शालेय उपमुख्यमंत्री हेडगर्ल म्हणून मयुरी भोई, अभ्यासमंत्री दिव्या भोई, शिस्त मंत्री राज पाटील, क्रीडामंत्री यश जाधव, सहलमंत्री भावना बारेला, स्वच्छता मंत्री भायराम बारेला व मुख्याध्यापक यांच्या कोट्यातून वैभव माळी व शितल भोई यांना हेड बॉय आणि हेड गर्ल यांना सहाय्यक मंत्री म्हणून निवड करण्यात आली.
प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांना सन्मानाचा बॅच, पुष्पहार, विजयाचा गुलाल टाकून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी एड.व्ही एस भोलाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन करून कौतुक केले हा शाळेने राबविलेला धरणगाव तालुक्यात पहिलाच कार्यक्रम आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी या निवडणुकीचे कौतुक केले मोबाईल व टॅबच्या माध्यमाने उभे-उभ बुथ तयार करणारे सर्व शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले. या माध्यमातून लोकशाहीचा महोत्सव व निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजली. या शाळेकडून प्रेरणा घेऊन इतर शाळांनी देखील असा कार्यक्रम राबवावा प्रशासन सहकार्य करेल असे प्रतिपादन सूर्यवंशी यांनी केले.
यानंतर प्रमुख अतिथींच्या समोर विजयी उमेदवारांची शाळेच्या प्रांगणात विजय मिरवणूक काढण्यात आली. मुलांनी गुलाल उधळून मनसोक्त आनंद घेतला. अशाप्रकारे मुलांनी ८ दिवसाच्या या प्रक्रियेत उत्साहाने भाग घेऊन सहभाग नोंदवला व निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून आपल्याला दिलेल्या खात्याला प्रामाणिकपणे न्याय द्या. असे सांगून मुलांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले. निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी म्हणून यांनी सहकार्य केले.

शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

▪️विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकी संदर्भात जनजागृती

▪️ लोकशाही महोत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव

▪️ EVM वर टॅब व मोबाईलच्या सहाय्याने निवडणूक

▪️ विजय उमेदवारांची जल्लोषात मिरवणूक

शालेय मंत्रीमंडळ- २०२५-२६

१. शालेय मुख्यमंत्री [ हेड बॉय ] - पुरुषोत्तम पाटील

२. शालेय उपमुख्यमंत्री [ हेड गर्ल ] मयुरी भोई,

३. अभ्यासमंत्री - दिव्या भोई

४. शिस्त मंत्री - राज पाटील

५. क्रीडामंत्री - यश जाधव

६. सहलमंत्री - भावना बारेला

७. स्वच्छता मंत्री - भायराम बारेला

मुख्याध्यापक यांच्या कोट्यातून मंत्री

वैभव माळी व शितल भोई यांना हेड बॉय आणि हेड गर्ल यांना सहाय्यक मंत्री म्हणून निवड

19
1356 views