शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार श्री.यादवराव सावंत यांना प्रतिष्टीत असा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरष्कार जाहीर....
शिंदखेडा:- 26/07/2025..( सारनाथ बोरसे ) :-- शिंदखेडा. जिल्हा.धुळे येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना पुणे येथील ए. डी. फौडेशन तर्फे दिला जाणारा भारतरत्न.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार पुणे येथील ग.दी. माडगूळकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात आला.
त्यांना हा पुरष्कार सहाय्यक आयुक्त महानगरपालिका पुणे सौ.वैशाली चव्हाण यांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.एक आदर्श पत्रकार म्हणून ते पूर्ण तालुक्यात माहिती आहेत. त्यांनी बऱ्याच वर्ष्यापासून त्यांच्या आदर्श पत्रकारिकाद्वारे समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे.याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरुष्कार उत्तर महाराष्ट्रातून एकमेव श्री. यादवराव सावंत यांना देण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर संपूर्ण तालुका आणि ज़िल्यातून अभिनंदन आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे......!
👉👉प्रतिनिधी.. सारनाथ बोरसे..
बातमीसाठी संपर्क करा... 8421369491.