logo

*मेसरे कुटुंबातील द्वीपुत्ररत्नांचा अभिष्टचिंतन व नामकरण सोहळा उपस्थित हजारोंच्या आशीर्वादाने संपन्न*

*मेसरे कुटुंबातील द्वीपुत्ररत्नांचा अभिष्टचिंतन व नामकरण सोहळा उपस्थित हजारोंच्या आशीर्वादाने संपन्न*

*सकारात्मक वातावरणात उपस्थित स्नेहींनी भोजनाचा घेतला आनंद*

मलकापूर:माता महाकाली देवीच्या कृपा आशीर्वादाने तसेच स्व.सौ लीलाबाई मेसरे यांच्या देवरुपी वात्सल्यपूर्ण आशीर्वादाने मेसरे कुटुंबात द्वीपुत्ररत्न प्राप्ती झाली.या आनंदाला अधिक द्विगुणित करण्यासाठी बाळाच्या नामकरण व अभिष्टचिंतन सोहळासह अन्नदान सोहळा उपस्थित हजारोंच्या आशीर्वादाने पार पडला.
मलकापूर शहरातील राजकीय,सामाजिक, व व्यापारी क्षेत्रात मेसरे कुटुंबीयांनी वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.मानवी जीवनात सुख आणि दुःख यांचे चक्र सातत्याने सुरू असते. असंख्य दुःखानंतर एखाद्या छोट्या सुखाचाही अनुभव हा आठवणीत राहतो. असेच काहीसे मेसरे कुटुंबात घडले. संसारिक नियमानुसार दुःखानंतर सुख आले.आई माता महाकालीची कृपा झाली आणि ॲड कृष्णा व भाग्यश्री तसेच विष्णू व रुपाली या दोघी दाम्पत्यांच्या पोटी पुत्र जन्माला आले.त्या आनंदाच्या निमित्ताने अन्नदान करता यावं असे कुठेतरी मेसरे कुटुंबियांना वाटले. म्हणून
या आनंदाचे कौटुंबिक स्वरूप न ठेवता सार्वजनिक स्वरूपात प्रगटीकरण करून एक वेगळी आठवण रूढ केली.त्याकरता शहरातील व माता महाकाली नगरातील आई-वडील स्वरूप तसेच नातेसंबंधातील वडीलधाऱ्यांना बाळांच्या नामकरण व अभिष्टचिंतन सोहळ्याला आमंत्रित केले. आमंत्रित सर्वांनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सदर कार्यक्रमात उपस्थित आई-बहीण स्वरूप महिलांनी नामकरण व अभिष्टचिंतन सोहळ्याला शोभतील अशा पारंपारिक ओव्या गाऊन प्रसंगी भक्ती मार्गातून नृत्य सुद्धा सादर केले. दरम्यान ॲड कृष्णा व भाग्यश्री यांच्या पुत्राचे "सूर्यांश" तर विष्णू व रुपाली यांच्या पुत्राचे "विरांश" नामकरण हजारोंच्या साक्षीने कृपा,आशीर्वाद देऊन करण्यात आले. सदर कायकर्मानंतर उपस्थितांनी भोजनाचा आनंद घेतला.अशाप्रकारे पुत्ररत्नांच्या प्राप्तीची आठवण ऐतिहासिक ठरली आह.

मेसरे कुटुंबीयांचे सस्नेह आमंत्रण स्वीकारून शहरातील माजी नगराध्यक्ष ॲड श्री हरीश रावळ, माजी नगरसेवक श्री सुहास चवरे,माजी नगरसेवक श्री अनिल गांधी,ॲड दिलीप बगाडे,ॲड योगेश पाटील,ॲड स्नेहल तायडे,ॲड सचिन देशमुख,ॲड सूरज भोपळे,ॲड महेंद्र राजपूत,ॲड निता डोस,ॲड दर्शना दिवे,ॲड फुरकान, तनिष्क फायनान्स चे संचालक श्री राहुल तायडे, माजी नगरसेवक शहजाद खान, कृउबास संचालक विजय साठे, राहुल देशमुख, हरीभाऊ गोसावी, विरसिंह राजपूत, गोपाल बोरखेडे,समाधान सुरवाडे,मनोज पाटील,अनिल गोठी,नागेश सुरंगे, करण झनके आदी सन्माननीय व स्नेही उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्यास बाळू धोरण,प्रकाश दाणे,गणेश भोपळे, दीपक भोलंकर तसेच माता महाकाली नगरातील स्नेही मित्रपरिवार यांचे सहकार्य अमूल्य ठरले.

*चौकट*
*माता महाकाली महिला भजनी मंडळाचे सादरीकरण कार्यक्रमाची ठरली खरी शोभा*

माता महाकाली नगरातीलच काही महिलांनी माता महाकाली महिला भजनी मंडळ स्थापन करून रूढी,परंपरा जपण्याच्या अनुषंगाने अशा धार्मिक, सामाजिक, वैयक्तिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून भक्ती मार्गाने नृत्य सादर करणे, स्तुती सुमनांचे सादरीकरण करणे, नामकरण सोहळा,अभिष्टचिंतन सोहळा वा इतर कुठल्याही कार्यक्रमाला खरी रंगत देण्याचे काम या महिला भजनी मंडळाकडून केले जाते. म्हणूनच यांच्या उपस्थितीतून संपन्न झालेला मेसरे कुटुंबीयांच्या येथील नामकरण व अभिष्टचिंतन सोहळा हा खऱ्या अर्थाने शोभिवंत ठरला.

4
171 views