logo

नांदी खेड्या गावात अभी कंट्रक्शन चा बोगस कारभार

*नांदिखेड्यात 'बस स्टॉप' नव्हे 'त्रास स्टॉप'! गावठाण जलमय; बांधकाम विभागावर प्रश्नांची सरबत्ती!*

प्रतिनिधी:चंदू मडावी

नांदिखेडा, [२३ जुलै २०२५]: मोहपा-तेलगावचा नवा रस्ता नांदिखेडावासीयांसाठी 'विकासा'ऐवजी 'विनाशा'ची नांदी ठरला आहे. गावाजवळच्या बस स्टॉपच्या चुकीच्या बांधकामामुळे पावसाचं पाणी थेट घरांत आणि शेतात घुसतंय, ज्यामुळे नागरिक आणि शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर आता स्थानिकांनी संतापाचा एल्गार पुकारला आहे!
नागपूरच्या अभी कन्स्ट्रक्शन कंपनीने नाल्याच्या मार्गातच बस स्टॉप उभारल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडला आहे. यामुळे गावठाण जलमय होतंय, घरांमध्ये पाणी शिरतंय आणि पिकांचंही मोठं नुकसान होतंय. "सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते झोपले आहेत का?" असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
फक्त बस स्टॉपच नाही, तर मांडवी ते तिडंगी रस्त्यावरचे अनेक पूलही खड्डेमय झाले आहेत, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायत सदस्य मनोज मांडवगडे आणि ग्रामस्थांनी तात्काळ बस स्टॉप हटवून नाल्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

341
14079 views