logo

देवा ग्रुप फाउंडेशन आरोग्य विभागाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष विनोद भगत " महाराष्ट्ररत्न पुरस्कार २०२५ " ने सन्मानित

रायगड (प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यातील व अलिबाग चेंडरे येथील मूळ रहिवासी., देवा ग्रुप फाऊंडेशन आरोग्य विभागाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष विनोद एकनाथ भगत यांना आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन यांच्यामार्फत " महाराष्ट्ररत्न पुरस्कार २०२५" नुकताच सिनेअभिनेत्री फाल्गुनी झेंडे व रंजना सिंग यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

देवा ग्रुप फाऊंडेशन आरोग्य विभाग हि विधायक, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. गेल्या वर्षभरात कु. अनिकेत मेस्त्री ( कोकण प्रदेशाध्यक्ष) यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली विनोद भगत यांनी कधीही कसलाही स्वार्थ न पाहता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई शहर या भागातील गोरगरीब गरजू यांना मोफत उपचार देऊन आतापर्यंत 100 हुन अधिक रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली आहे. विनोद भगत यांच्या हातून असेच समाजकार्य घडत राहो. अशीच सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.

7
589 views