logo

बंद केलेला शिवरस्ता सुरू करण्याची मागणी, तहसिलदारांना निवेदन सादर तहसिलसमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

गंगापूर । कायगाव येथील नजनवस्ती ते अहील्यादेवी बारव येथे जाणारा शिवरस्ता जेसीबीद्वारे उकरून बंद केलेला रस्ता चालु करण्यासाठी शेतकऱ्यांनी शाळकरी मुलांना सोबत घेऊन गंगापूर तहसील कार्यालयासमोर 22 जुलै पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे रस्त्यांचे प्रश्न तत्परतेने मार्गी लावण्यात यावे, प्रशासनाने थेट बांधावर पोहचुन शेतरस्ते मोकळे करून द्यावे. शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते पाणंद रस्ते मोकळे करून द्यावे

यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या सूचनेनुसार तसेच विभागीय आयुक्त यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा गंगापूर तहसील कार्यालयाकडून काहीच उपयोग होईना रस्ते खुले करून देण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झीजवुन तर कधी लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील नजनवस्ती ते अहील्यादेवी बारव कडे जाणारा गट नं. ९८ मधील शिवरस्ता रस्ता एका शेतकऱ्याने खोदुन बंद केला असून रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना व शाळेतील

विद्याथ्यांना जाण्या-येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे एवढेच नव्हे तर रस्ता बंद केल्याने विद्यार्थी घरीच असुन यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बंद करण्यात आलेला रस्ता चालू करुन द्यावे म्हणून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार दिली मात्र याचा काहीच उपयोग होत नसल्याने अखेर 22 जुलै पासून गंगापूर तहसील कार्यालयासमोर बाबासाहेब नजन, गणेश नजन, श्रीहरी नजन या शेतकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थीनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

15
456 views