मोहपा भाजप शहर अध्यक्षपदी तपासे यांची निवड
नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी कळमेश्वर मोहपा प्राप्त माहितीनुसार शहराची भाजप कार्यकारणी सभा नुकतीच संत गजानन सभागृह येथे पार पडली. सभेचे उदघाटक मा. आमदार डॉ आशिषबाबु देशमुख अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष मा. मनोहरभाऊ कुंभारे प्रमुख उपस्थित प्रदेश कार्यकारणी सदस्य जेष्ठ नेते डॉ राजीवजी पोतदार जिल्हा संघटक किशोरजी रेवतकर उपस्थीत होते. कार्यक्रमा ला सुरुवात दिप प्रज्वलन महामानवांना हार अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी डॉ पोतदार साहेबांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन भाजप सरकारच्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता असलेल्या योजना ची माहीती द्यावी भाजप हा पक्ष सर्व सामान्य लोकांच्या हक्का साठी लढण्यासाठी तयार झाले ला पक्ष आहे असे सांगितले ... मनोहर भाऊ कुभांरे यांनी आपल्या भाषणातून मधुगंधा तलावाची चाबीचे दुरुस्ती चे रखडलेले काम मा. आमदार यांनी त्वरीत मार्गी लावले तसेच मोहपा शहराचा झालेला चुकीचा सीटी सर्वे रद्द करून नव्याने सीटीसर्वे करण्याचे काम भाजप सरकारच्या नेत्यांनी केले असे सांगितले व भाजप कार्यकर्तानी आपसी मतभेद विसरून पक्षाचे काम करा आणी जनतेची कामे करा या प्रसंगी कुभांरे यानी नवीन शहराध्यक्ष पदी निळकंठ तपासे यांची निवड करण्यात आली असे जाहीर केले ... महामंत्री म्हणून महमूद गफ्फार शेख राकेश गणोरकर महिंद्रा खाटिक यांची निवड करण्यात आली.. उपाध्यक्ष म्हणून वासुदेव कावडकर सुनील दिक्षित रतन मोहरीया यांची निवड झाली भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश सेवतकर उपाध्यक्ष म्हणून स्वप्नील येनुरकर यांची निवड झाली... महिला मोर्चा अध्यक्ष सौ. स्नेहा आशिष लंगडे उपाध्यक्ष म्हणून सौ. अभिलाषा ललित चिमोटे यांचे कडे जवाबदारी देण्यात आली. भाजप जेष्ठ आघाडी अध्यक्ष श्री. भास्करराव भेलकर गुरुजी उपाध्यक्ष म्हणून शंकरराव उमप प्रकाशराव मोगरे याचे कडे जवाबदारी देण्यात आली...या प्रसंगी मावळते भाजप शहराध्यक्ष विलास गणोरकर यांनी चांगली जवाबदारी पार पाडली म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित अध्यक्ष तपासे यांनी मा.आमदार डॉ.आशिषबाबु देशमुख मा. मनोहर भाऊ कुभांरे मा. डॉ राजीवजी पोतदार यांचे आभार मानले.. याप्रसंगी माजी सभापती मिना तायवाडे तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती दिलीप धोटे तालुका महिला अध्यक्ष बेबीताई धूर्वे तालुका उपाध्यक्ष नाना काथवटे वैशाली ढगे तालुका महामंत्री वैभव टेकाडे मंगेश चौरे पंचायत समिती उपसभापती चिचखेडे ताई जेष्ठ नेते बापुसाहेब हळदे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष ईमेश्वर यावलकर माजी शिक्षण सभापती श्रीकांत येणुरकर माजी नगरसेवक संजय देशमुख माजी शहराध्यक्ष रमेश चर्जन वामनराव रेवतकर प्रभाकर मारोतकर सुरेश चिमोटे संजय कोरडे व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक प्रविण श्रोते संचालन सोपीनाथ चांदेकर आभार प्रदर्शन निळकंठ तपासे यांनी मानले...