
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य रक्षक
नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
प्राप्त माहितीनुसार
नागपूर सावनेर
• मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सावनेर येथे उत्साहात साजरा.
• आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी आयोजित केले भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीर.
आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त, सावनेर येथे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भव्य रोगनिदान शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी केली आणि रक्तदान करून समाजसेवेचे उत्तम उदाहरण सादर केले. सोबतच शेकडो लोकांनी आरोग्य तपासणी केली. लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथील विविध विभागातील डॉक्टरांनी व ब्लड बँकेने येथे सेवा उपलब्ध करून दिल्या. गरजूंना नि:शुल्क औषध वितरण देखील करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी देवेन्द्रजी फडणवीस यांना सावनेर विधानसभा क्षेत्रातर्फे शुभेच्छा देताना गेल्या 10 वर्षात देवेन्द्रजी फडणवीस महाराष्ट्राची सेवा करत आहेत, त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र खूप पुढे जात प्रगती करत आहे. त्यांनी जनतेच्या आरोग्याची हमी घेत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरु केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाखो लोकांचे उपचार नि:शुल्क होतात. तसेच मोठया आजारावर पण मुख्यमंत्री सहायता निधीमधून विशेष उपचार केला जातो. नागपूर येथे सावनेर रोडवर जिल्हा रुग्णालय सुरु होणार आहे. पाटणसावंगी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरु होईल. सावनेर येथे 100 खाटांचे ट्रामा सेन्टर लवकरच सुरु होणार आहे. माझी माऊली फाउंडेशन व लता मंगेशकर हॉस्पिटलद्वारे आरोग्यवाहिनी बस सेवा सुरु करत आहे. अशा अनेक उपक्रमांद्वारे आपण सावनेर विधानसभा क्षेत्रातील लोकांची काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य रक्षक आहेत, असे म्हटले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मनोहरजी कुंभारे यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी मनोहरजी कुंभारे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोद्दार, रामराव मोवाडे, तुषार उमाठे, स्वप्नील चौधरी, विजय देशमुख, महेश चकोले, संदीप उपाध्याय, अशोक तांदुळकर, देविदास मदनकर, दिलीप धोटे, मंदार मंगळे, दिगंबर सुरतकर, प्रमोद पिंपळे, अनंता पडाळ, राजू घुगल, पियुष बुरडे, विलास ठाकरे, प्रफुल मोहटे, पंकज भोंगाडे, मंगेश कोठाडे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.