
सातारा शहरात धक्कादायक व चिंता निर्माण करणारी घटना.
एकतर्फी प्रेमातून एका शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवल्याने सर्व कॉलनी घाबरली.लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते पण तो लोकांना धमकी देत होता.या घटनेमुळे सातारा पोलिस प्रशासनासह महाराष्ट्रच हादरण्याचा प्रकार घडला. त्यामुळे महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याची भीती न राहिलेली नाही का? त्यामुळे अशा घटना होत आहेत.
युवक अल्पवयीन नसल्याने त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे नाव आर्यन वाघमळे असून त्याचे 18 वर्ष पूर्ण आहे. तो मूळ आरळे गावचा रहिवाशी असून सध्या मोळाचा ओढा येथे राहत आहे. या युवकावर पोलिसांनी पोक्सो कायदा, विनयभंग, दुखापत व आर्म ऍक्ट कायद्यांतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.
अल्पवयीन शाळकरी मुलीला पकडत, गळ्याला चाकू लावून आशिकने दहशत केली. ही घटना सातारा शहरात घडली. त्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. सुदैवाने उमेश आडगळे याने पाठिमागून येत या माथेफिरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेवून मुलीची सुटका केली. त्यानंतर नागरिकांनी तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीला गळ्याला चाकू लावून तिला ठार करण्याची धमकी सनकी युवक देत होता. तेथील जमाव समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याने काहीही ऐकलं नाही. लहान मुलगी वाचवण्यासाठी आराडा ओरड करत होती. त्यामध्ये मुलीच्या गळ्याला जखम झाली.
हे पाहताच माथेफिरू युवकाच्या तावडीतून मुलीला वाचवण्यासाठी उमेश आडगळे यांनी जीव धोक्यात घालत भिंतीच्या कठड्यावर मुलाच्या हातातील चाकू काढून घेतला, तिची सुटका केली. उमेश हा तिच्यासाठी देवदूता प्रमाणे धावून आला