logo

संत नामदेव महाराज यांची 675 पुण्यतिथी आळंदीमध्ये शिंपी समाज यांच्याकडून उत्साहात साजरी

आळंदी देवाची
संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आळंदीमध्ये क्षत्रिय अहिर शिंपी समाज यांच्याकडून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली
प्रथम दीप प्रज्वलन करून संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर संत नामदेव महाराज यांची प्रतिमा पालखीमध्ये ठेवण्यात आली आणि आळंदी मध्ये नगर प्रदक्षिणा करण्यात आली पालखी ही दत्त मंदिर या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी भजन टाळ मृदंगाच्या गजरामध्ये नामदेव महाराजांचे अभंग म्हटले गेले नंतर महिला भगिनींनी संत नामदेव संत नामदेव महाराज यांचा अतिशय उत्साहामध्ये जयघोष केला नंतर पालखी पुन्हा शंकनाथ महाराज यांच्या मठामध्ये आली आणि त्यानंतर विविध उपक्रम राबवण्यात आले
यामध्ये समाज बांधवांनी आपले विचार मांडले त्यापैकी श्री चंद्रकांत शेठ शिरसाट यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आपला शिंपी समाज हा चित्रकुटू हुन महाराष्ट्रात आलेला आहे याचा आपल्याला खूप असा अभिमान आहे त्यानंतर श्री ह भ प गोपालदास महाराज यांनी आपले विचार मांडताना सांगितले की संत नामदेव महाराजांनी खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले आज देवाला म्हणजेच पांडुरंगाला प्रसाद तू दाखव त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल हा अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रगट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद यांनी ग्रहण केला त्यानंतर श्री ह भ प डॉक्टर ज्ञानेश्वर खैरनार यांनी प्रवचन केले आणि सूत्रसंचालन श्री मयूर सोनवणे यांनी केले महिला मंडळांनी देखील उस्फुर्तपणे नामदेवरायांचे चरित्रावर ती भाषण केले या कार्यक्रमाला आळंदी मधील संपूर्ण शिंपी समाज उपस्थित होता
ब्युरो चीफ - जनार्दन सोनवणे पुणे

27
7808 views