logo

निबंध स्पर्धेत देवाजी दुर्गे जिल्ह्यात प्रथम

निबंध स्पर्धेत देवाजी दुर्गे जिल्ह्यात प्रथम
गडचिरोली:

शिक्षक क्लब ऑफ जालनातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचे 6 विषय दिले होते. स्पर्धेत राज्यभरातून 177 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यात गडचिरोली जिल्ह्यातून पेरमिली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुमीरकसा येथील शिक्षक देवाजी श्रावण दुर्गे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
बक्षीस वितरण सोहळा जेईई महाविद्यालय जालना येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तथा साहित्यीक एम. जी. जोशी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, कवियत्री भारती हेरकर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते देवाजी दुर्गे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी मुख्य संयोजक राजेश मगर, डॉ. शिवनंदा म्हेत्रे, प्राचार्य डॉ. अशोक खरात, आर. आर. जोशी, साजिद खान, प्रा. यशवंत सोनवणे, मुळे, महापले, इंगोले तसेच राज्यभरातील विभागनिहाय 177 शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण 13 परीक्षकांनी केले. निबंध स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल देवाजी दुर्गे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

10
2876 views