संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाला यश – सातारा नगरपालिका यांचे शतशः आभार
संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाला यश – सातारा नगरपालिका यांचे शतशः आभार
सध्या साताऱ्यात पावसाळ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्यू व मलेरियासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरात झाडझुडपे वाढल्याने रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता होती.
या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड सातारा शहराच्यावतीने जिल्हाध्यक्ष रफीक शेख यांनी सातारा नगरपालिकेकडे निवेदन दिले होते. या निवेदनात संपूर्ण सातारा शहरात फॉगिंग मशीनच्या सहाय्याने धूरफवारणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत सातारा नगरपालिका आरोग्य विभागाने मागील दोन दिवसांपासून संपूर्ण शहरात फवारणी मोहीम हाती घेतली आहे.
या तात्काळ आणि प्रभावी कारवाईबद्दल संभाजी ब्रिगेड सातारा शहराच्यावतीने सातारा नगरपालिका व आरोग्य विभागाचे मनःपूर्वक आभार.