logo

देवगावमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!


देवगावमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

अमळनेर प्रतिनिधी –
राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी आहे, आणि याच भावनेतून महाराष्ट्रातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिंदी भूषण व हिंदी विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ‘राष्ट्रभाषा विकास परिषद’, माध्यमिक व उच्च शिक्षण विभाग संलग्न संस्थेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली. हिंदी भूषण परीक्षेत इयत्ता आठवीतील 13 विद्यार्थ्यांनी, तर हिंदी विभूषण परीक्षेत नववी व दहावीच्या 28 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. एकूण 41 विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सहभागी होणे ही खेडीपाड्यातील राष्ट्रभाषा अभ्यासाला मिळालेली ठोस दिशा म्हणावी लागेल.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी हिंदी विभागप्रमुख आय. आर. महाजन सर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. विद्यार्थ्यांना अभ्यासातील आत्मविश्वास मिळवून देत त्यांनी भाषा शिकण्याच्या प्रेरणेचा जागर केला.
संस्थेचे अध्यक्ष मा. विलासराव पाटील व मुख्याध्यापक अनिल महाजन सर यांनी परीक्षेच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शिक्षक एस. के. महाजन सर, एच. ओ. माळी सर, तसेच शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक अरविंद सोनटक्के सर यांनीही परीक्षेच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.
ही परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात शांत व अभ्यासास पोषक वातावरणात पार पडली, यामुळेच विद्यार्थ्यांनी नक्कीच उत्तम कामगिरी केली आहे, असा विश्वास परीक्षेचे आयोजक व्यक्त करत आहेत.
परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना “भारतीय त्यौहार” हे मूल्य ₹112 चे प्रेरणादायी पुस्तक तसेच मान्यताप्राप्त प्रमाणपत्र राष्ट्रभाषा विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणार आहे.
भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून संस्कृतीची वाहक असते, याचा प्रत्यय या परीक्षेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे.

1
86 views