logo

सैनिक महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांचा देखील उत्साही सहभाग

मराठेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली) – सांगली जिल्हा सैनिक संरक्षण समिती तालुका शिराळा व जय जवान आजी माजी बहुउद्देशीय सैनिक संघटना वाळवा, शिराळा उत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सैनिक महामेळावा रविवारी (दि. २० जुलै) राधिका मल्टीपर्पज हॉल, मराठेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकरूड पोलीस ठाण्याचे A.P.I. जयवंत जाधव होते. त्यांनी उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पालेकर यांनी "संघटना म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व" या विषयावर मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक संजय जाधव यांनी, "आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देणे हीच आपली खरी संपत्ती आहे," असे विचार मांडले. महिला उपस्थितांनी देखील कार्यक्रमात आपली मते प्रभावीपणे मांडली.

मेळाव्याचे उत्तम संयोजन सर्जेराव रोकडे, लक्ष्मण पाटील, निसार नायकवडी, राजू कदम यांनी केले.

या वेळी राजारामबापू पाटील साखर कारखाना वाटेगाव युनिटचे सुरक्षा अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विलास माने, शिवाजी चौगुले, बाजीराव देशमुख, शंकर गायकवाड, तानाजी जाधव, अशोक खोत, शिरीष पाटील आदींसह वाळवा व शिराळा तालुक्यातील मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक उपस्थित होते.

1
0 views