logo

पुण्यात खळबळ, खडकवासला धरणाच्या जंगलात तरुण-तरुणीची बॉडी सापडली, दोघांच्या शेजारी.... Pune Couple Ends Life Khadakwasla : पुण्यात खडकवासला धरणाजवळ एका अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती आहे. प्रेमसंबंधांना कुटुंबियांचा विरोध असल्याने दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पुण्यात खळबळ, खडकवासला धरणाच्या जंगलात तरुण-तरुणीची बॉडी सापडली, दोघांच्या शेजारी....
Pune Couple Ends Life Khadakwasla : पुण्यात खडकवासला धरणाजवळ एका अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती आहे. प्रेमसंबंधांना कुटुंबियांचा विरोध असल्याने दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.आदित्य भवार, पुणे : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकवासला धरणाजवळ मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुला-मुलीचा मृतदेह आढळला आहे. दोघांनी विषारी औषध सेवन करुन आयुष्याचा शेवट केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव अक्षरा (वय १६, रा. महादेव नगर, मांजरी) असून, ती दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा प्रियकर संतोष (रा. मांजरी, मूळगाव रावळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्यासह तिने एकत्रच विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

0
12 views