logo

जुलैचा पाऊस’ पुन्हा भेटीला, कोकणात 'ऑरेंज अलर्ट'; मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता Maharashtra Weather Update : जुलैच्या

जुलैचा पाऊस’ पुन्हा भेटीला, कोकणात 'ऑरेंज अलर्ट'; मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : जुलैच्या पहिल्या २० दिवसांत मुंबईकरांनी पावसाची प्रतीक्षा केली, परंतु रविवारपासून जोरदार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने दक्षिण कोकणासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाल्याने आणि अनुकूल वातावरणीय स्थितीमुळे पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.मुंबई : जुलै महिन्यातील पहिले २० दिवस फारसा पाऊस न झालेल्या मुंबईने रविवारी रात्रीपासून मात्र जोरदार पाऊस अनुभवला आणि अखेर जुलैचा पाऊस भेटीला आल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली. रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. सोमवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणामध्ये पुढील चारही दिवस ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईमध्येही बुधवार, गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.मुंबईमध्ये सांताक्रूझ केंद्रावर रविवारी स. ८.३० ते सोमवारी स. ८.३० या २४ तासांत ११४.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचवेळी कुलाबा येथे केवळ ११.२ मिमी पाऊस नोंदला गेला. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला होता. अलिबाग येथे ९० मिमी, मुरुड ७७ मिमी, श्रीवर्धन ६५ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण कोकणात पावसाचा जोर येत्या चार ते पाच दिवसांमध्ये वाढण्याचा अंदाज आहे. मुंबईमध्ये सोमवारी स. ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत सांताक्रूझ येथे ८७ मिमी, तर कुलाबा येथे केवळ आठ मिमी पावसाची नोंद झाली. विलेपार्ले, सांताक्रूझ येथे ९० मिमीहून अधिक पाऊस दिवसभरात नोंदला गेला.

7
83 views