logo

रविवारी मराठा सेवा संघातर्फे आष्टी येथे राज्यस्तरीय मराठा वधु वर व परिचय मेळावा

समाजामध्ये विवाह जुळवणाऱ्या मध्यस्तांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वधु वर मेळाव्यांचे आयोजन करणे काळाची गरज आहे. म्हणून मराठा सेवा संघ वधु वर कक्षाच्या वतीने आष्टी, जिल्हा बीड येथे राज्यस्तरीय वधु वर व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह व मंगल कार्यालय आष्टी येथे होणार आहे.
या मेळाव्यामध्ये मराठा समाजातील उच्चशिक्षित घरांदा मध्यमवर्गीय शेतकरी डॉक्टर इंजिनिअर प्राध्यापक वकील शिक्षक पोलीस शास्त्रज्ञ हायटेक क्षेत्र तसेच इतर सर्वच क्षेत्रातील मुले आणि मुली संपूर्ण राज्यभरातून उपस्थित राहणार आहेत .
मेळावा यशस्वी करण्यासाठी आष्टी शहरांमध्ये जय्यत तयारी चालू आहे.मराठा सेवा संघ व 33 कक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या मेळाव्यासाठी स्वागत समिती, स्टेज व्यवस्थापन समिती, अल्पोपहार व्यवस्था समिती, बैठक व्यवस्था समिती, नाव नोंदणी समिती अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
मेळाव्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. मेळाव्यास येताना वधू-वरांनी दोन पासपोर्ट फोटो व आपला बायोडाटा दोन प्रति मध्ये सोबत आणायचा आहे. अधिक माहितीसाठी ॲड. सीताराम पोकळे, (94 21 63 80 55),संयोजक यांच्याशी संपर्क साधावा. मराठा समाजाच्या वधू-वरांनी या परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाच्या विभागीय उपाध्यक्षा शिवमती सुवर्णाताई गिरे यांनी केले आहे.

13
400 views