logo

माखजन हायस्कुल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अ‍ॅड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी व नुकतेच वकील झालेले आंबव पोंक्षे गावचे रहिवासी अ‍ॅड प्रसाद कदम उपस्थित होते. यावेळी संस्था अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,दीपक शिगवण, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकशिक्षक ,पालक,गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता १० वी मध्ये व १२ वी मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी ट्रस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध परितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले.यावेळी आर्या पडये,आर्यन तांबट,कु कातकर,प्रणाली पिसे,जान्हवी पवार आदी विद्यार्थी उपस्थित होते.दरम्यान या कार्यक्रमात शाळेत राबवलेल्या इंग्लिश शब्द पाठांतर स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.

5
81 views