
आदिवासी प्रतिष्ठान आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल मोतीबिंदू चिकित्सक व शस्त्रक्रिया शिबिर
आदिवासी प्रतिष्ठान आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल त्यांच्या संयुक्त विद्यमाने मु.जाधववाडी पोस्ट नवघर ता. सुधागड जि. रायगड या ठिकाणी मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आला होता या शिबिराला जाधववाडी, मुळशी, आसरे, नवघर, तोरणपाडा मुळशीआदिवासीवाडी,कळंब कौळशी या गावातल्या नागरिकांचा तसेच आदिवासी बांधवांचा चांगला प्रतिसाद लाभला ८० प्लस नागरिकांना शिबिरात समावेश झाला त्यावेळी माननीय डॉक्टर आरती मॅडम, कॉन्सलर सोनिया माळी मॅडम. संयोजक दत्ता ठाकूर यांचे सहकारी पांडुरंग दंत या सर्वांचा आदिवासी प्रतिष्ठान संस्थेकडून शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तसेच ग्रामस्थ मंडळ जाधववाडी ग्रामस्थांचा देखील शाळ श्रीफळ देऊन मान सन्मान करण्यात आला त्यावेळी आदिवासी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष माननीय.श्री. सचिन शंकर सागळे
आदिवासी प्रतिष्ठान अध्यक्ष मा. श्री.तुषार शेडगे आदिवासी प्रतिष्ठान सहसचिव मा. श्री शंकर सागळे आदिवासी प्रतिष्ठान सदस्य दिनेश बाळकृष्ण जाधव सुप्रिया सागळे ग्रुप ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अनिता जाधव तसेच जाधववाडी ग्रामस्थ मा. श्री विठ्ठल जाधव, बबन जाधव, रमेश अधिकारी, अशोक जाधव, तसेच आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांनचे आदिवासी प्रतिष्ठान च्या वतीने आभार माणण्यात आले...