logo

काटोल तालुक्यातील खैरी चिखली येथे 1984 पासून अनुसूचित जातीचे आरक्षण नाही.

काटोल तालुक्यातील खैरी (चिखली) येथे १९८४ पासुन 'अनुसूचित जातीचे आरक्षण' नाही. व या गावात अजुन पर्यंत 'अनुसूचित जातीचे' एकदा आरक्षण आले होते.परंतु राजकीय लोकांच्या खेळीमुळे अनुसूचित जाती च्या लोकांना १९८४ पासुन आतापर्यंत सरपंच पदापासून
वंचित ठेवले . निवडणूक आयोगाला वेळोवेळी पुरावा देऊन सुद्धा दुर्लक्ष होत आहे.जवळ जवळ एक वर्षाचा काळ लोटुन सुध्दा उत्तर मिळत नाही. प्रशासकीय अधिकारी सुद्धा लेखी पत्र असून उडवा उडवी चे उत्तरे देतात. त्यामुळे हतबल झालेले खैरी येथिल ग्रामपंचायत सदस्य अंकित दशरथजी रंगारी हे जिल्हाधिकारी कार्यालयावर पैदल वारी करणार‌ आहे. व सर्व लेखी पत्र घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर विचारणार आहे.

12
745 views