
स्व.दत्ताजी नलावडे यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा व गौरव सोहळा उत्साहात संपन्न
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले दत्ताजी नलावडे यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर विधानसभेचे सभापती पद भूषवले. त्यांचा हा प्रवास आजच्या पिढीसाठी आणि लोकप्रतिनिधींना नेहमीच प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे यांनी केले.
दत्ताजी नलावडे यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष नलावडे, संस्थेचे सचिव सूर्यकांत देवस्थळी, संचालक शामसुंदर माने, संचालिका प्रिया नलावडे, सुवर्णा देवस्थळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दत्ताजींच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक कुवळेकर यांनी केले. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील ९० कि.मी. अंतराच्या कॉम्रेड मॅरॅथॉन स्पर्धेत यश मिळवणारे सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सुभाष नलावडे यांनी दत्ताजींचा राजकीय प्रवास उलगडला, तर रामराव बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
🔹 कथाकथन स्पर्धा:
▪️पहिली ते चौथी – वैष्णवी पडये (प्रथम), रुद्र मांडरकर (द्वितीय), आराध्या बाचीम (तृतीय)
▪️पाचवी ते सातवी – स्वरा घाटपांडे (प्रथम), साई सुर्वे (द्वितीय), सिद्धी पांचाळ (तृतीय)
▪️आठवी ते दहावी – प्रांजल कवळकर (प्रथम), श्रावणी बने (द्वितीय), सृष्ठी बाचिम (तृतीय)
🔹 चित्रकला स्पर्धा:
▪️पहिली ते चौथी – अर्णव पेडामकर (प्रथम), श्रेया बाचिम (द्वितीय), पूर्वा बोले (तृतीय)
▪️पाचवी ते सातवी – अथर्व चांदीवडे (प्रथम), देवयानी भायजे (द्वितीय), शुभम बोले (तृतीय)
▪️आठवी ते दहावी – सिमरन चांदीवडे (प्रथम), ईशा जुवळे (द्वितीय), द्रीपेश बाचिम (तृतीय)
या कार्यक्रमात भातगाव, पेंढाबे, आरवली, माखजन, धामापूर, पिरंदवणे आदी गावांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज माने यांनी केले. बक्षीस वितरणाची जबाबदारी सचिदानंद शिर्के यांनी पार पाडली, तर आभार प्रदर्शन पराग खैर यांनी केले.
शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.