logo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ससेगाव येथे चिखल गुट्टा शर्यत संपन्न

Kolhapur - शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य देवा भाऊ केसरी 2025 चिखल गुट्टा शर्यत उत्साहात पार पडली.

या शर्यतीचे आयोजन शाहूवाडी शेतकरी जनआक्रोश मोर्चा चे नेते व भाजप नेते मा.आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री हनुमान तरुण मंडळ ससेगाव यांच्या विद्यमाने करण्यात आले होते.

या प्रसंगी विविध गावांतून आलेले बैलगाडी मालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड, दत्ता वारकरी, P.S.I विलास भोसले विलास दादा पाटील वनिता संजय पारळे सरपंच ससेगाव विक्रम केसरे तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेनंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांचा गौरव करण्यात आला. मानकरी पुढीलप्रमाणे –
1. प्रथम क्रमांक: सागर शिवाजी पोवार (गाव – बांदीवडे)
बैलजोडीचे नाव: सोन्या / पक्षा

2. द्वितीय क्रमांक: राजाराम दगडू पाटील (गाव – जाधववाडी)
बैलजोडीचे नाव: गुडल / शंकर

3. तृतीय क्रमांक: कमल राजाराम कोटकर
बैलजोडीचे नाव: काडतु / विशाल

4. चतुर्थ क्रमांक: बी.डी. पाटील फाउंडेशन
बैलजोडीचे नाव: वंशा / चारोळ

5. पंचम क्रमांक: संत बाळूमामा प्रसन्न, हनुमंतवाडी
बैलजोडीचे नाव: चंद / बुलेट

कार्यक्रमाची सांगता सर्व विजेत्यांचा सत्कार आणि बैलगाडी मालकांच्या अभिनंदनाने झाली. उपस्थित शेतकरी व नागरिकांनी आयोजक आबासाहेब पाटील यांचा विशेष सत्कार केला.

1
13 views