सावनेर मध्ये बुलेटच्या कर्कश आवाज ब्रेक पोलिस दलाच्या प्रयत्नांना यश
नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावीनागपूर सावनेर प्राप्त माहितीनुसारसावनेर, 20 जुलै 2025: सावनेर शहरातील नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेट मोटरसायकलींच्या कर्कश आवाजावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात हे विशेष अभियान राबवण्यात आले.नागरिक, विशेषतः वृद्ध आणि विद्यार्थी, या आवाजामुळे त्रस्त होते. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते हितेश दादा बनसोड यांनी अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर, उमेश पाटील यांच्या आदेशाने ट्राफिक पोलीस ए. एस. आय. सुभाष रुढे, किशोर राठोड आणि विशाल बडधे यांच्या पथकाने मोहीम राबवली.या मोहिमेदरम्यान, 8 बुलेट गाड्या ताब्यात घेऊन 7 गाड्यांवर प्रत्येकी ₹1000 दंड आकारण्यात आला. तसेच, त्यांचे 'मोडीफाईड सायलेन्सर' घटनास्थळीच काढून टाकण्यात आले.या कारवाईमुळे सावनेरकरांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.